परंडा / प्रतिनिधी - 

समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखनीचा प्रामाणिकपणे वापर केल्यास वंचीत घटकांना नक्कीच न्याय मिळतो.पत्रकारांची भुमिका एखाद्या तज्ञ शल्य चिकित्सा सारखी असावी तसेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारिता करावी असे मत जेष्ट पत्रकार तथा माजी आमदार सुजातसिंह ठाकुर यांनी दर्पनदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पणदिनानिमित्त  व्हाईस आॕफ मिडिया पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवार (दि.६) रोजी शहरातील सरगम मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थित बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जि.प.माजी सभापती दत्ता साळुंके, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, पोलीस निरिक्षक आमोद  भुजबळ, सपोनि कविता मुसळे, सरगम उद्योग समुहाचे अध्यक्ष बाशाभाई शहाबर्फीवाले, विकास कुलकर्णी, मेजर महावीर तनपुरे, रावसाहेब खरसडे आदीची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमात तालुक्यासाठी भरीव योगदान देणाऱ्या जेष्ट पत्रकार सुजितसिंह ठाकुर, सुशिलकुमार शुक्ला, श्रीराम विद्वत, मुजिब काझी आदीचा गौरव करण्यात आला.

सुजातसिंह ठाकुर पुढे म्हणाले की,पुर्वीच्या काळात आम्हा- पत्रकारांना बातमीच्या शोधासाठी कठीण प्रसंगाचा संघर्ष करावा लागाला.सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे पत्रकारिता सोपी झाली आहे. पत्रकारांनी आपल्या लेखनीचा योग्य वापर करुन आचार्य जांभेकरानी ज्या उद्देशाने पत्रकारिता सुरु केली त्यांचा आदर्श घेऊन पत्रकारितेची वाटचाल करावी.

माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील म्हणाले की,पत्रकारांच्या सहकार्याच्या माध्यमातून आमच्या सारखे विविध राजकीय पक्षाचे निवडून येतात.पत्रकारांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्भिडपणे पत्रकारिता करावी.याप्रसंगी पोलिस निरिक्षक आमोद भुजभळ म्हणाले की, आजच्या काळात माध्यमाची स्वरुप बदलले असले तरी प्रिंट मिडीयाचे महत्त्व कायम टीकुन असुन आजही ग्रामीण व शहरी भागातील वाचकांचा वर्तमानपत्रावर विश्वास टीकुन आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्हाईस आॉफ मिडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद, तालुकाध्यक्ष प्रमोद वेदपाठक, मुजीब काझी, आप्पासाहेब शिंदे, तानाजी घोडके, प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे, आलीम शेख, रविद्रं तांबे, शंकर घोगरे, शिवाजी सुर्यवंशी, नाना केसकर, भजनदास गुडे, मनोज परांडकर, दत्ता नरूटे, समीर ओव्हाळ आदीनी पुढाकार घेतला.या कार्यक्रमास माजी सैनिक, व्यापारी, वकील आदी नागारिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे,सुत्रसंचन प्रा.डॉ.शहाजी चंदनशिंवे तर आभार आप्पासाहेब शिंदे यांनी मानले.


 
Top