तुळजापूर/ प्रतिनिधी-

 यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मौजे होनाळा येथील विशेष वार्षिक शिबीरामध्ये १८ जानेवारी 23रोजी सकाळी ९:००वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी ४५गावकऱ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.   यावेळी उच्च रक्तदाब, मधुमेह, गुडघेदुखी, डोळ्यांचं आरोग्य इ.तपासण्या करण्यात आल्या.ज्या गावकऱ्यांना गंभीर समस्या असतील त्यांना पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर आणि जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे पाठवण्यात आले. 

 या वेळी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील डॉ. नितु कदम ,श्रीमती बी.सी.हिरेमठ,श्रीमती डी.एस जगदाळे, श्रीमती आश्विनी देशमुख यांचे सहकार्य लाभले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. आंबादास बिराजदार,डॉ.अशोक कदम,प्रो डॉ.अशोक मरडे, प्रा.डॉ. शिवाजी जेटीथोर, श्री हणमंत भुजबळ यांनी प्रयत्न केले.यावेळी ग्रामस्थ व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top