तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तालुक्यांतील मौजे निलेगाव  येथील  एका शेतकऱ्याच्या शेतातील  पञाच्या शेडरुपी  गोठ्यास अज्ञाताने आग लावल्याने यात पञ्याचा शेडरुपी गोठ्यासह आत बांधलेल्या चार शेळ्या  जळुन भस्मसात होवुन यात शेतकऱ्यांचे लाख रुपयाचे नुकसान  झाले.  ही घटना मंगळवार दि. १७रोजी राञी घडली.

  या दुर्घटनेत  शेतकरी रफिक पटेल यांचे चार शेळ्या व पञ्याचा शेडसह   एक लाख रुपये नुकसान झाले आहे. या प्रकरणी इटकळ,औट पोस्ट खबर दिली असता पोलिस तसेच सरपंच उपसरपंच यांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला. या गरीब शेतकऱ्यास शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.


 
Top