उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  भारताला मोठा गौरवशाली इतिहास व संस्कृतिक परंपरा असुन कमजोर देश ही प्रतिमा बदलुन   नरेंद्र मोदी यांच्या कार्यपध्दतीने एक बलशाली राष्ट्र बनवून देश पुढे येत आहे. भारतातील केवळ तिरुपती देवस्थानची मालमत्ता रुपये २.५ लाख कोटीहुन अधिकची असुन जगातील १०० हून अधिक देशांचा जि.डी.पी. याहुन कमी आहे. पंतप्रधान   नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण अमृत महोत्सव साजरा करीत असुन खऱ्याअर्थाने अमृतकाल आला आहे, प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री  अजय कुमार मिश्रा यांनी भाजपा कार्यालय, उस्मानाबाद येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना संबोधित करतांना केले. 

आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून विकासात्मक व संघटनात्मक बळकटीकरणाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकसभा प्रवास योजना राबविण्यात येत असून  उस्मानाबाद   लोकसभा मतदार संघाची जबाबदारी केंद्रीय गृह राज्यमंत्री  अजय कुमार मिश्रा यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.  या अनुषंगाने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

व्यासपीठावर लोकसभा प्रभारी आ.विजय देशमुख, मा.आ.सुजितसिंह ठाकूर, आ.राजेंद्र राऊत, आ.अभिमन्यू पवार, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जेष्ठ नेते अँड.मिलींद पाटील, दत्ताभाऊ कुलकर्णी आदी तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य, सर्व मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हाभरातुन आलेले प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी मिश्रा  म्हणाले की, भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कष्टाळू असुन तो पार्टी विस्तारासाठी निरंतर काम करत आहे. ज्या प्रमाणे परिस्थिती बदलत असते त्यानुसार आपली रणनीती बदलणे आवश्यक आहे. गावागावातील प्रत्येक बूथ पर्यंत आपले पक्ष संघटन बळकट करणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना तसेच आपल्या आमदार व अन्य लोकप्रतिनिधींनी केलेले काम हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. पन्ना प्रमुखापर्यंत आपले संघटन पोहोचले असून प्रत्येक मतदारांपर्यंत आपला कार्यकर्ता पोहोचेल यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक गेल्या अनेक महत्वाच्या बाबी सांगितल्या असुन उद्योग आणि सोलर क्षेत्रात अनेक प्रकल्प येथे उभे राहू शकतात.त्यासाठी पोषक वातावरण आहे. 

 धाराशिव नामांतर लवकरच 

 लोकसभा प्रवास योजनेच्या अनुषंगाने देशातील उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र हे अत्यंत महत्वाचे राज्य आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाची सुरुवात या राज्यातून झाली, अनेक महान संत, महापुरुष व वीर पुरुषांची हि भूमी आहे. त्यातही आपला उस्मानाबाद जिल्हा महत्वाचा असून देशातील लाखो लोक आई तुळजाभवानीच्या आशीर्वाद घेण्यासाठी जिल्ह्यात येतात. उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलणे गरजेचे असुन त्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. 

 
Top