उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा, लिंगायत धर्माला  संवैधानिक मान्यता मिळावी या मागणीसाठी 29जानेवारी 2023 रोजी मुंबई येथे अखिल भारतीय लिंगायत समाजाच्या वतीनेमहामोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती लिंगायत समाज संघटनेचे समन्वयक अविनाश भोसीकर यांनी 'पत्रकार परिषदेमध्ये दिली.

रविवार दिनांक 8 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस रवी कोरे आळणीकर अॅड. अजय वागळे उपस्थित होते. अविनाश भोसीकर यांनी पत्रकारांशी बोलताना आमची हिंदू संस्कृती असून धर्म मात्र लिंगायत आहे. ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा समोर आला होता त्यावेळेस सामाजिक न्याय विभागाने लिंगायत हा धर्म आहे. जातीला आरक्षण मिळत असते असे सांगून जातीनिहाय आरक्षण दिले आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्या या मागणीसाठी यापूर्वी दहा जिल्ह्यात दहा मोर्चे काढले आहेत परंतु याचा कोणताही विचार केला गेला नाहीत्यामुळे 29 जानेवारी रोजी मुंबई येथे महामोर्चा काढणार असल्याचे सांगितले

लिंगायत धर्माचा विषय न माडणाऱ्या आमदार खासदारांना घरी बसवणार

लिंगायत समाजात अनेक जाती पोट जाती आहेत लिंगायत समाजाच्या मतावर  समाजातील अनेक लोक आमदार खासदार झाले आहेत. परंतु त्यांनी   विधानसभेत अथवा लोकसभेत लिंगायत धर्मा विषयी  प्रश्न मांडलेला नाही, त्यामुळे आगामी निवडणुकीत याचा विचार निश्चित करून निर्णय घेण्यात येईल,असा इशाराही भोसीकर यांनी दिला.

42 संघटना सहभागी होणार

मुंबई येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चात मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वरांचे राष्ट्रीय स्मारक करावे, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे व लिंगायत धर्माला संवैधानिक  मान्यता द्यावी आदी मागण्या मांडण्यात येणार आहेत. या मोर्चात लिंगायत समाजातील 42 संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती भोसीकर यांनी दिली. 


 
Top