उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त उस्मानाबाद शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक युनूस शेख यांच्या हस्ते बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने जेष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, प्रशांत कावने, प्रा.सय्यद सर यांचा पोलिस निरीक्षक युनूस शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,
यावेळी जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष रहिम शेख, अमजद सय्यद, वैभव पारवे, आकाश नेरोटे,सकैलास चौधरी मल्लिकार्जुन सोनवणे, अरूण गंगावणे, पांडुरंग मते , सलीम पठाण व प्रमोद राऊत कुंदन शिंदे यांच्यासह आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.