उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील तेरणा पब्लिक स्कूलच्या (सीबीएसई) थ्रो बॉल संघाची राज्यस्तरीय पातळीवरील शालेय थ्रो बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या शाळेच्या संघाने लातूर येथे झालेल्या विभागस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत अजिंकपद पटकवले.                                   

लातूर शहरातील देशी केंद्र विद्यालयाच्या क्रिडांगणावर विभागस्तरीय थ्रो बॉल स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत तेरणा पब्लिक स्कूलच्या 19 वर्षाखालील संघाने नांदेड व लातूर जिल्हा संघाचा पराभव करून अजिंक्यपद पटकवले. या संघाची राज्यस्तरीय पातळीवर पुणे येथे होणाऱ्या शालेय थ्रो बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हा संघ लातूर विभागाचे नेतृत्व करणार आहे. या संघात यश पाटील, शिवसंग्राम भोसले, आदित्य कांबळे, कुणाल पाटील, करण सरडे, प्रणव गुंड, सुमित पाटील, प्रणव मोरे, सागर गरड, अक्षय राठोड, स्वप्नील जाधव, आदित्य मगर या खेळाडूंचा होता.

  या यशाबद्दल मार्गदर्शक क्रीडा शिक्षक व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष श्री एल. एल. पाटील, सचिव अनंतराव उंबरे, प्राचार्य, क्रीडाशिक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top