उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील पानवाडी, म्होतरवाडी, जागजी या तीन गावचे पोलीस पाटील सुभाष गणपतराव कदम यांचा उल्लेखनिय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.        

 2021-2022 या वर्षात गाव पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करून पोलिसांना शासकीय कामात मदत केली व गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केल्याने सुभाष कदम यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी ढोकी पोलीस ठाण्यात हा कार्यक्रम झाला. 

यावेळी कळंब उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश, ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत, पोलीस उपनिरीक्षक कपिल बुद्धेवार, भागवत गाडे, सहाय्यक फौंजदार सुहास गवळी, पोहेकॉ शेळके, तेरचे बिट अंमलदार प्रदीप मुरळीकर, श्रीमंत क्षीरसागर, गजेंद्र गुंजकर, सुखदेव जाधव आदी उपस्थित होते.

 
Top