तेर / प्रतिनिधी

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या किर्तन महोत्सव उत्साहाने साजरा संपन्न झाला.

या महोत्सवात प्रफुल्ल महाराज मोरे, विजय महाराज बारगीर, श्रीकांत महाराज कदम, ज्ञानेश्वर महाराज सोनवणे,पार्थ महाराज कापसे,विजय महाराज डक,कालीदास महाराज नाईकनवरे,हरी महाराज चाकूरकर,महारूद्र महाराज पवार,बाळू महाराज गिरगावकर,अक्रुर महाराज साखरे, संजय नाना धोंगडे, निवृत्ती महाराज देशमुख, डॉ.जयंत महाराज बोधले,शिवा महाराज बावस्कर, विशाल महाराज खोले तर काल्याचे किर्तन गोविंद महाराज पांगरकर यांचे संपन्न झाले.तेरच्या मुख्य रस्त्यावरून भव्य दिंडी नगरप्रदक्षिणा काढण्यात आली.किर्तन महोत्सवात मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.किर्तन महोत्सवासाठी ह.भ.प.रघुनंदन महाराज पुजारी व भाविकभक्त यांनी परीश्रम घेतले.


 
Top