उस्मानाबाद / प्रतिनिधी

 राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 सोलापूर – उमरगा या महामार्गाच्या अपुर्ण कामाच्या संदर्भात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मा. मंत्री महोदय, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रकल्प संचालक, एस.टी.पी.एल. तसेच जिल्हाधिकारी यांना वारंवार पत्रव्यवहार करुन राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण करण्याच्या अनुषंगाने दि. 14 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. 

सदरील बैठकीमध्ये मा. जिल्हाधिकारी यांच्या समक्ष 31 डिसेंबर 2022 पुर्वी कामे सुरु करण्याचे व सदरील कामांचा प्रगती अहवाल देणेबाबत प्रकल्प संचालक यांनी मान्य केले होते सदरील बैठकीमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 सोलापूर-उमरगा महामार्गाचे काम करणाऱ्या एस.टी.पी.एल. कंपनीने 2016 मध्ये महामार्गाचे काम पुर्ण करणे अपेक्षित होते परंतु या कंपनीने सदरील महामार्ग पुर्ण केला नाही त्यामुळे महामार्गावर आजपर्यंत झालेल्या अपघातात मृत्यु पावलेल्या प्रवाशांची आकडेवारी संग्रहित करावी व त्या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व कंपनीचे व सदरील ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय सदरील ठेकेदार व अधिकारी यांच्यावर धाक बसणार नाही अशी सुचना खासदार निंबाळकर यांनी केल्या होत्या. सदर बैठकीमध्ये खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी 31 डिसेंबर 2022 पुर्वी काम सुरु न केल्यास 1 जानेवारी 2023 पासुन टोल बंद करणार असल्याचे संबंधित कंपनीचे प्रतिनिधी व प्रकल्प संचालक यांना कळविले होते तसेच 31 डिसेंबर 2022 पुर्वी कामे सुरु करण्याचे व सदरील कामांचा प्रगती अहवाल देणेबाबत प्रकल्प संचालक यांनी मान्य केले होते परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रगती अहवाल व कार्यवाही करण्यात आली नसल्याने नाईलाजास्तव आज दि. 01 जानेवारी 2023 पासून सदर महामार्गावरील फुलवाडी टोल प्लाझा व तलमोड टोल प्लाझा येथील टोल वसुली शिवसेना स्टाईलने बंद करण्यात आली.

  यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार ओमराजे निंबाळकर व बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश अप्पा वाले माजी तालुकाप्रमुख उमरगा, भगवान जाधव, बाबुराव शहापुरे, कमलाकर चव्हाण, प्रतिक रोचकरी, बाळकृष्ण पाटील, संतोष पुदाले, मेजर जाधव, रजाक अत्तर, रणधीर पवार, सुधाकर पाटील, रंजीत सास्तुरे, दगडू पाटील, माधव म्हात्रे, महेश शिंदे, आशिष जाधव, नितीन नागदे, गोपाळ शिंदे, अमोल गंगथडे, प्रशांत बनसोडे, सचिन भोसले, सागर सुरोशे, मनोज मोरे तसेच शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top