वाशी/ प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिर वाशी शाळेने यश संपादन केले. 

 शाळेचे इयत्ता पाचवी चे एकुण सहा विद्यार्थी परीक्षेत पात्र झाले यापैकी दिग्विजय दत्तात्रय कवडे हा विद्यार्थी 246 गुण घेऊन शिष्यवृत्तीधारक झाला. त्याच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री एस एल पवार सर व अजिंक्य विद्या मंदिर वाशीचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मीकांत पवार सर यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. 

 तसेच दिग्विजय ला शाळेतील शिक्षिका पल्लवी क्षिरसागर,सोनाली पाटील, स्वप्नाली सांडसे इ. चे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे श्री एस एल पवार सर यांनी कौतुक केले.

 
Top