उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पत्रकार दिनाचे औचित्य साधून तेर येथे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा तथा लेडीज क्लबच्या अध्यक्षा  सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणुन पत्रकारांना संबोधले जाते. पत्रकार बांधव हे सशक्त लोकशाहीचा आधार स्तंभ म्हणून जनजागृतीचे मोठे कार्य करत असतात. त्यांच्या अथक परिश्रमास एक नागरिक म्हणून कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य ठरते. "दर्पण"कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी पत्रकार दिवसाचे औचित्य साधून समाजासाठी अविरत झटणाऱ्या पत्रकार बांधवांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

 संत श्रेष्ठ गोरोबा काकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुरातन, वैभवशाली तेर नगरीचे नाव संपुर्ण महाराष्ट्रभर पसरवून पुन्हा एकदा तेरची संस्कृती, नावलौकीक आपल्या लेखणीच्या बळावर, वैभवांच्या शीखरावर घेवून जाण्याचे कार्य व समाजातील उपेक्षीतांना न्याय देण्यासाठी जनजागृतीचे कार्य तेर येथील पत्रकारांच्या माध्यमातून नेहमीच करण्यात आलेली आहे. 

 यावेळी पत्रकार श्री.नरहरी बडवे, श्री.सुभाष कुलकर्णी, श्री.सुमेध वाघमारे, श्री.हरीभाऊ खोटे, श्री.विकास भोरे, श्री.विजय कानडे, श्री.अनंत साखरे, श्री.गोरख माळी, श्री.सागर ढोणे, श्री. इरशाद मुलाणी, श्री.तानाजी बंडे, श्री.बालाजी पांढरे यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. तसेच दै.पुण्यनगरीचे पत्रकार श्री.हरीभाऊ खोटे यांची उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलही त्यांचा सत्कार करण्यात आला.

 या प्रसंगी श्री.बाळासाहेब वाघ, जि.प.चे माजी उपाध्यक्ष श्री.शिवाजीराव नाईकवाडी, श्री.पदमाकर फंड, तेरच्या नवनिर्वाचित सरपंच सौ.दिदी लोकेश काळे, उपसरपंच श्री.श्रीमंत फंड, माजी सरपंच श्री.नवनाथ नाईकवाडी, माजी उपसरपंच श्री.रवी चौगुले, श्री.भास्कर माळी, श्री.विठल लामतुरे, श्री.बाळासाहेब कदम, बबलु मोमीन, ग्रा.पं. चे सर्व नवनिर्वाचीत सदस्य व ग्रामस्थ उपस्थीत होते.


 
Top