उमरगा/प्रतिनिधी 

संस्कृती फाउंडेशन संचलित इंडियन पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन गुंजोटी रोड येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देवा श्री गणेशा, बम बम बोले, पापा की परी आदी गाण्यांवर बहारदार नृत्य सादर करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा वॉरियर संघटनेचे तालुकध्यक्ष विनोद कोराळे, प्रमुख पाहुणे मारुती खमितकर, अभयकुमार हिरास, विनायक झिंगाडे, शिक्षक योगीनाथ जोकरे, शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी कनशेट्टी, आरती बिराजदार, प्रशांत कनशेट्टी, सुरेखा बिराजदार, नागनाथ बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी, लावणी, सांस्कृतिक गीते अशा विविध गीतांद्वारे सादरीकरण करून उपस्थित श्रोत्यावर्गास मंत्रमुग्ध केले.  

विनोद कोराळे म्हणाले, सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यामुळे ते आगामी काळात सक्षम होऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावतात. 

योगीनाथ जोकरे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे एकमेव व्यासपीठ म्हणजे स्नेहसंमेलन. यातून पालकांनाही विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात येतात. त्याद्वारे पालकांनाही विद्यार्थ्यांच्या घडणघडीत मोलाचे योगदान देता येते.

 
Top