उस्मानाबाद / प्रतिनिधी-

संपूर्ण हिंदुस्ताना मधे इंग्रजांच्या विरुद्ध एक मोठा लढा उभारणारे महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा 06 जानेवारी 2023 (शुक्रवार) रोजी सकाळी-9.00am किल्ले वाफगाव(ता-खेड, जिल्हा-पुणे) येथे प्रति वर्षानुसार मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास संपूर्ण देशातून अनेक ऐतिहासिक घराण्यांचे वंशज, राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्ती-संघटना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून..सर्वांनी गट-तट बाजूला ठेऊन या ऐतिहासिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी केले आहे. गजी नृत्य, ढोल वादन, मर्दानी खेळ, शस्त्र अस्त्र प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, इतिहासिक व्याख्यान, इत्यादी या शाही सोहळ्याचे आकर्षण असणार आहेत...

03 डिसेंबर 1776 रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म वाफगाव च्या किल्ल्या मधे झला. पुढे अनेक लढायांमध्ये सहभागी होत त्यांनी आपल्या पराक्रमाचा परिचय दिला.. पण 1798-99 मध्ये सुभेदार तुकोजीराव होळकर यांच्या निधनानंतर होळकर घराण्यावर मोठे संकट आले..ज्या घराण्याने उत्तरेमध्ये स्वराज्याच्या सीमा अटकेपार नेहल्या त्या होळकर घराण्याला संपावण्याचे डाव रचले जाऊ लागले... या कठीण काळात आपले कुलदैवत खन्डोबा चे दर्शन घेऊन जेजुरी हून फक्त एक घोडा आणि अंगावरच्या वस्त्रानिशी बाहेर पडलेल्या महाराजा यशवंतराव होळकर यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर आपले राज्य पुन्हा मिळवले व 06 जानेवारी 1799 रोजी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला.. हि बाब आजच्या तरुण वर्गासाठी प्रेरणा दायी आहे.. कि कोणतीही गोष्ट अशक्य नाही... 

इथेच न थांबता राजस्थान, माळवा, पंजाब, दिल्ली अश्या मोठ्या प्रदेशामध्ये महाराजांनी इंग्रजांविरुद्ध मोहीम सुरु करत देशातील सर्व राजा महाराजांना इंग्रजांविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले.. इंग्रजांना महाराजांनी अनेक युद्धांमध्ये पराभूत केले. त्यांची इतकी देहशत होती कि इंग्रज यशवंतराव महाराजांना भारताचा नेपोलिअन म्हणत व त्यांच्याशी बिनशर्त संधी करायला तयार होते..पण महाराजांचे ध्येय होते स्वतंत्र हिंदुस्थान....

 अश्या या पराक्रमी देशभक्त राजाचे जन्मस्थान असलेला सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधलेला व पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या वास्तव्याने पावन अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार वाफगावचा किल्ला आज हि दुर्लक्षित- उपेक्षित आहे.. त्याचे जतन संवर्धन व्हावे या साठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे अशी भावना भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केली..

 
Top