नळदुर्ग / प्रतिनिधी-

 नळदुर्ग (मैलारपुर) येथील प्रसिद्ध व ऐतिहासिक श्री खंडोबाची यात्रा दि.६ जानेवारी रोजी भरत आहे.या यात्रेमध्ये एकही अवैध धंदा सुरू होऊ नये याबाबतचे निवेदन शहर शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांना देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की,सध्या नळदुर्गचा  (मैलारपुर)  येथे श्री खंडोबा यात्रा महोत्सव सुरू आहे.या यात्रेमध्ये एकही अवैध धंदा सुरू होऊ देऊ नये. यात्रेमध्ये, चोरी,टायगर गेम, लालपत्ता,काळा पत्ता सोरट,अशाप्रकारचे अवैधधंदे सुरू झाले तर भांडणतंटे, मारामाऱ्या असे प्रकार सुरु होतात. यामुळे यात्रेला गालबोट लागते. या अवैध धंद्यामुळे यात्रेकरूंची मोठी लुट होते.त्यामुळे पोलिस प्रशासनाने यात्रेमध्ये अवैध धंदे सुरू होऊ नयेत याची काळजी घ्यावी.या यात्रेमध्ये परराज्यातील खंडोबा भक्त मोठ्या संख्येने येतात.त्याचबरोबर चोरटेही येतात,.त्यामुळे खंडोबा मंदिर व परीसरात सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश खंडोबा देवस्थान ट्रस्टला द्यावेत .संपुर्ण यात्रा सीसीटीव्हीच्या कक्षात असेल तर चोरीसारख्या घटनांना मोठयाप्रमानात आळा बसु शकतो.नळदुर्ग शहरांतील कांही व्यक्ती पोलिस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून यात्रेत अवैध धंदे सुरू करण्याचा हालचाली करीत अहेत. आशा व्यक्तींवर कडक कारवाई करावे अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चवहन,शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले,उपतालुकप्रमुख सरदारसिंग ठाकुर,राजेंद्र जाधव, नेताजी महाबोले, शाम कनकधर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top