तुळजापूर  / प्रतिनिधी-

तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नामनिर्देशन भरण्याच्या अखेर च्या दिवशी शुक्रवारी १७६ व अखेरच्या   दिवसा पर्यंत सरपंच पदासाठी तब्बल २५२ उमेदवारांनी  आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. 

तर ग्रामपंचायतचा ४१८ पदासाठी शुक्रवारी सदस्य ९०९ उमेदवारांनी व अखेरचा दिवसापर्यत ११९५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.   यामध्ये सरपंच पदासाठी अखेरच्या दिवशी अपसिंगा ग्रामपंचायत येथून सर्वाधिक 11 जणांनी मिळून असे एकूण 15 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला . त्यापाठोपाठ काक्रंबा येथून एकूण 13 तर काटी आणि सावरगाव येथून प्रत्येकी 11 भावी सरपंचानी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले .

  ग्रामपंचायत सदस्याच्या एकूण ४१८ जागेसाठी एकूण ११९५  उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले . यामध्ये सर्वाधिक 55 अर्ज काटी ग्रामपंचायत येथून आले तर सावरगाव येथून ४६  तर अपसिंगा येथून ४२  उमेदवारांनी आपले सदस्य पदासाठी अर्ज दाखल केले . उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने निवडणूक कार्यालय परिसरास जञेचे स्वरुप प्राप्त झाले होते.     उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख  १८ डिसेबरला मतदान व २०डिसेबरला मतमोजणी आहे. 


 
Top