तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ( पेठ) येथे सशक्त भारत अभियानांतर्गत क्रीडा सप्ताहाचे मुख्याध्यापक विक्रम खडके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 यावेळी गोरोबा पाडुळे , यरकळ गणपती , शेजाळ वर्षा  , देशमुख शशिकांत , चौरे गोरख , नाईक उषा , मुंढे प्रभावती , हलसीकर रोहिणी , बंडगर लता , पांचाळ शकुंतला आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते  यावेळी या क्रीडा सप्ताह कालावधीत १०० , २०० , ४०० , ६०० , मीटर धावणे , गोळा फेक , थाळी फेक , उंच उडी , लांब उडी , अडथळा , ४ ×१०० मीटर बॅटन रिले  , संगीत खुर्ची , स्लो सायकलिंग आदी वैयक्तिक क्रीडा प्रकारासह कबड्डी , खो खो , लंगडी , या सांघिक खेळाचे ही आयोजन करण्यात येणार आहे या स्पर्धा इयत्ता पहिली ते सातवीच्या गटातील मुला मुलींसाठी स्पर्धा होणार आहेत क्रीडा सप्ताह यशस्वी करण्यासाठी क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , गोरोबा पाडुळे परिश्रम घेत आहेत. 


 
Top