तुळजापूर  / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावननगरीत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात  आरोग्य विषयक असलेल्या उणीवा मांडल्या असता त्या उणीवा मी लवकर दूर करण्याचा प्रयत्न करीन अशी ग्वाही  केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  डॉ. भारतीताई पवार  यांनी दिली. 

 तिर्थक्षेञ तुळजापूरात लाखोच्या संख्येने देवीदर्नशनार्थ भाविक येतात माञ येथे त्यांना अत्यावश्यक आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नाहीत.  प्रामुख्याने रुग्णालयात ICU(अतिदक्षता विभाग) ची व्यवस्था नसल्याने अनेक रुग्णांना उस्मानाबाद (धाराशीव) पाठवावे लागते तरी यासाठी प्रयत्न व्हावे, असे सांगितले. यावेळी उपस्थित असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ गलांडे सर यांना मंत्री महोदयांनी येत्या 8 दिवसात  ICU(अतिदक्षता विभाग)  तयार करा व मला त्याचे फोटो पाठवा अशा सूचना केल्या,तसीच अपुऱ्या जागे पार्श्वभूमीवर दुसरा मजल्यासाठी प्रयत्न करीन व रिक्त डाँक्टर व कर्मचारी पदे भरण्याची   ग्वाही  दिली.

 यावेळी  जिल्हा परिषद उपाध्यक्षा  अर्चनाताई पाटील, उस्मानाबाद जिल्हा मजूर फेडरेशन चेअरमन नारायण नन्नवरे जिल्हाध्यक्ष नितिन काळे, रूग्ण कल्याण समिती उपजिल्हा रुग्णालय.सदस्य आनंद कंदले,  तालुकाध्यक्ष संतोष  बोबडे, अँड . दिपक आलुरे,  प्रभाकर मुळे,  विजयराव शिंगाडे, राजेश्वर गडु  कदम,.राम चोपदार,  अमित मोगरकर व सहकारी उपस्थित होते.

 

 
Top