उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगत सिंह कोशारी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत जोरदार आंदोलन करण्यात आले. उस्मानाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून वाचाळवीर राज्यपाल व मंत्र्यांचा निषेध नोंदविण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि.2) हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष बिराजदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल व मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ. प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, अजितदादा पवार विचारमंचचे अध्यक्ष नंदकुमार गवारे, मसूद शेख, जिल्हा उपाध्यक्ष वाजिद पठाण, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल , शहर अध्यक्ष अयाज शेख, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष असद पठाण, उद्योग व्यापार जिल्हाध्यक्ष विवेक घोगरे,सेवादल जिल्हाध्यक्ष सतीश घोदेराव, तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील,महिला तालुकाध्यक्ष रंजना भोजने, उस्मानाबाद शहर उपाध्यक्ष राजकुमार पवार, उस्मानाबाद तालुका ऊपाध्यक्ष जयंत देशमुख, लीगल सेल शहराध्यक्ष ॲड.योगेश सोन्ने पाटील ,लीगल सेल कार्याध्यक्ष ॲड.अविनाश जाधव, जिल्हा चिटणीस शिवाजीराव देशमुख, उद्योग व व्यापारी विभाग जिल्हाध्यक्ष ॲड.विवेक घोगरे, माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत,बाबा मुजावर,सामाजिक न्याय विभाग शहर कार्याध्यक्ष नारायण तुरुप, शहर उपाध्यक्ष अनिकेत पाटील,विद्यार्थी तालुकाध्यक्ष प्रतीक माने, बलभीम गरड ,पंकज भोसले, रणवीर इंगळे, मृत्युंजय बनसोडे,अन्वर शेख, ,अप्सरा पठाण, ज्योती माळळे.यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.