उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ऐतिहासिक दस्तावेज लिहिणाऱ्या लोकांनी शूरवीर यशवंतराव होळकरांचा खरा इतिहास लोकांसमोर आणला नाही, असे प्रतिपादन डॉ. संतोष पाटील यांनी होळकर यांच्या जयंतीनिमत्त बोलताना केले.

शहरातील अहिल्यादेवी होळकर चौक येथे शनिवार दि. ३ डिसेंबर रोजी यशवंतराव होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डाॅ.संतोष पाटील बोलत होते. या कार्यक्रमास श्रीकांत तेरकर, लिंबराज डुकरे, श्रीकांत देशमुख, संतोष वतने, अशोक गाडेकर, संभाजी गुंडरे, बालाजी वगरे, राहुल गवळी, रवी देवकते, विकी आंधारे, रवी भोसले, इंद्रजीत तेरकर, गणेश एडके, सुरेश शिंदे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर डुकरे यांनी केले.तर आभार नरसिंह नेटकरी व सचिन चौरे यांनी मानले. 

 

 
Top