उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नुकसानीच्या तुलनेत सन 2022 ची विमा रक्कम अत्यल्प मिळालेले आहे. ती नुकसानीप्रमाणे मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर व शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे शुक्रवारी (दि.2) निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे.

या निवेदनात म्हंटले आहे की, सन 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसानीकोटी भारतीय कृषी विमा कंपनीने 254 कोटी रुपये नुकसान भरपाई वितरीत केली आहे. प्रत्यक्ष मिळणार्‍या नुकसान भरपाईच्या दहा टक्के विमा रक्कम मिळाल्या नाहीत व काहींना तर एक रुपयाही मिळालेला नाही. जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये शेतकर्‍यांनी वेळोवेळी विमा कंपनींना दिलेल्या सूचनेप्रमाणे केलेल्या पंचनाम्याप्रमाने काढणी पश्चात नुकसानीच्या सूचनेप्रमाणे व पीक कापणी प्रयोगातून निष्पन्न झालेल्या नुकसानीपोटी विमा वितरित केला पाहिजे होता. परंतु यापैकी कुठल्याही प्रकारचा अवलंब न करता मनमानीप्रमाणे विमा कंपनीने विमा वितरित केला आहे. तरी वरील विमा कंपनीच्या चुकांची शिक्षा शेतकर्‍यांवर आर्थिक बाजूने होणार असल्यामुळे अगोदरच नुकसानीत असलेल्या सोयाबीन पीक विमा भरून शेतकर्‍याचे एक प्रकारचे नुकसानच झालेले दिसत आहे. तरी पिक विमा कंपनीने वरील चुकांची दुरुस्ती करून शेतकर्‍यांना विम्याची नुकसान भरपाई पंचनाम्यामध्ये झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने मिळणे गरजेचे आहे. ते न मिळाल्यास शेतकर्‍यांना येत्या दहा दिवसात लोकशाही मार्गाचा अवलंब करून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे. त्यामुळे विमा कंपनीचे चुकीचे विमा वितरण ताबडतोब दुरुस्त करण्याच्या संबंधितांना सूचना द्यावेत, अशी मागणी संजय पाटील दुधगावकर यांनी निवेदनात केली आहे.


 
Top