तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे १८ सप्टेंबर राेजी घरातले मटन कुत्र्याने खाल्याने संतप्त झालेल्या बापाने मुलीला गोळ्या घालून ठार केले होते. त्यानंतर आराेस पिता गणेश भोसले हा फरार झाला होता.  गणेश भोसले हा वारंवार आपले ठिकाण बदलून राहत असल्याने पोलिसांच्या तो हाती लागत नव्हता.   आखेर  पोलिसांनी आरोपी असलेला पिता गणेश भोसले यास अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे.
 या बाबतीत अधिक माहीती अशी की, कार्ला  (ता. तुळजापूर)  येथील  गणेश झंपण भोसले व मिराबाई गणेश भोसले या दोघा पती पत्नींनी दि . १८.० ९ .२०२२ रोजी  कार्ला येथे त्यांची मुलगी काजल मनोज शिंदे , (वय २२ वर्षे) हिस कुत्र्याने मटन खाल्याच्या कारणावरून शिवीगाळ करुन पिता- गणेश भोसले यांनी काजलवर रिव्हाल्वर मधून गोळी झाडून तीचा खून केला होता.  तसेच गणेश भोसले व मिराबाई भोसले या दोघांनी मनोज सुनिल शिंदे , (रा . कार्ला ) यांसही ठार मारण्याची धमकी दिली होती . या प्रकरणी  मनोज सुनिल शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम ३०२ , ५०४ , ५०६ , ३४ सह शस्त्र कायदा कलम ३ ( २५ ) , ( २७ ) अंतर्गत नळदुर्ग पो.ठा. येथे गुन्हा क्र . ३०७/२०२२ हा नोंदवला होता .
 सदर गुन्ह्यातील आरोपींचा पोलीश शोध घेत असताना त्या आरोपीचा त्याच्या गावी ठावठिकाणा लागत नसल्याने पोलीस त्यांच्या मागावर होते . ते वेळोवेळी आपले वास्तव्या बदलत असल्याने पोलीसांनी तांत्रिक विश्लेशन करून व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यातील मुख्य आरोपी गणेश झंपाण्या भोसले हा चिखली , (ता . शिराळा , जि . सांगली )येथे तो वास्तव्यास असल्याचे समजले . 
यावर   पोलीस अधीक्षक   अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नमूद ठिकाणी रवाना झाले होते . पथकाने तो रहात असलेल्या चिखली शिवारातील एका शेत घरातून गणेश यास दि . ०४.१२.२०२२ रोजी अटक करुन उस्मानाबाद येथील गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता तुळजापूर पो.ठा. येथील गुन्हा क्र . २३२ , २ ९ १ / २०२२ व बेंबळी पो.ठा. येथील गुन्हा क्र . १७० , १८३/२०२२ अशा मारहान , मालमत्ता नुकसान व विनयभंग या गुन्ह्यातही तो पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले . अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खूनाच्या गुन्ह्यासह अन्य चार गुन्ह्याचा उलगडा केला आहे . सदरची कामगीरी मा . पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी ,  अपर पोलीस अधीक्षक   नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. च्या पोनि  यशवंत जाधव , सपोनि  शैलेश पवार , पोउपनि  संदीप ओहोळ , पोलीस अंमलदार- समाधान वाघमारे , महेबुब अरब , नितीन जाधवर , बबन जाधवर , सुनिल मोरे यांच्या पथकाने केली.


 
Top