उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रीय  गुरव समाज महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या परमपूज्य श्री संत काशिबा महाराज गुरव यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र अरण तालुका माढा येथे सकाळी ठीक नऊ वाजता महा अभिषेकाचा समारंभ संपन्न झाला.

कार्यक्रमास हरिभक्त पारायण हभप देहूकर महाराज  महाराष्ट्रातील प्रसिद्ध तुतारी वादक गुरव सातारा यांच्या तुतारी वादनाच्या नादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .

राष्ट्रीय गुरव समाज महासंघा चे महासचिव मल्लिकार्जुन गुरव, राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या कार्यारणीचे सदस्य शशिकांत,  राष्ट्रीय गृह समाज प्रदेश प्रदेश कार्यकारणी सदस्य चंद्रकांत गुरव, राम कृष्ण गुरव गुरुजी अकलूज व हरिभाऊ गुरव माळुंग, श्री गोविंद गुरव मुंबई , अंकुश गुरव , गणेश गुरव  तसेच हभप उंदरकर महाराज आणि गावातील प्रतिष्ठित मंडळी तसेच पदाधिकारी बहुसंख्य श्री संत काशिबा महाराज यांचे अनुयायी   श्री कांबळे साहेब माजी सभापती, जिल्हा परिषद  श्री गोरे  असे अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित दर्शविली. त्याचप्रमाणे गुरव समाजाच्या अधिवेशनात   मुख्यमंत्री एकनाथराव  शिंदे   यांनी राष्ट्रीय गुरव समाज महासंघ आयोजित श्री संत काशिबा महाराज आर्थिक विकास महामंडळची घोषणा केल्याबद्दल आणि 50 कोटी रुपये या महामंडळाला भांडवलच्या रूपात दिल्याबद्दल येथील सभेत गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात आले. गावातील अनेक भक्तगण उपस्थित होते

 
Top