उस्मानाबाद /प्रतिनिधी-

 संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या ‘चार वर्षांतील वाटचालीचा चित्रमय मागोवा’ या पुस्तिकेचे प्रकाशन अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील, या पुस्तिकेचे संपादक प्रा. सोमनाथ लांडगे,

कवी फुलचंद नागटिळक, माधव पवार, अरविंद मोटे, प्रा. सुहास पुजारी, पूर्वा पुजारी आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम मारुती चितमपल्ली यांच्या निवासस्थानी झाला. संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्यावतीने मागील चार वर्षांपासून मंगळवेढा ते देहू या तीर्थक्षेत्रादरम्यान चोखाबा ते तुकोबा अशी समतेची वारी काढण्यात येते. या चार वर्षांतील संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या कार्याचा आढावा या पुस्तिकेत घेण्यात आला आहे. मारुती चितमपल्ली यांनी  या पुस्तिकेचे तसेच संकल्पनेचे कौतुक केले व संत चोखामेळा अध्यासन केंद्राला शुभेच्छा दिल्या. या वारीचे अध्यक्ष ह.भ.प शिवाजीराव मेारे महाराज यांनी भ्रमणध्वनीद्वारे मारुती चितमपल्ली यांना समता वारीबद्दल माहिती दिली.

 
Top