उस्मानाबाद /प्रतिनिधी-

तालुक्यातील पवारवाडी ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये 30 लाख 98 हजार 92 रूपये रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी प्रभारी गटविकास अधिकार्‍यांसह सहाय्यक लेखाधिकारी ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, कंत्राटी सहाय्यक, कंत्राटी कारकुन यांच्यासह 12 जणांवर उस्मानाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार   सुरेश तायडे, प्रभारी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, उस्मानाबाद , आर.जे. लोध, सहायक लेखा अधिकारी, अंगद आगळे, तत्कालीन ग्रामसेवक , अशोक मुंडे, ग्रामरोजगार सेवक , स्वाती कांबळे, कंत्राटी सहायक,  विश्वनाथ राउत, कंत्राटी कारकुन , प्रभावती लोहार, सोमनाथ लोहार, अनुराधा रणसिंग, विजयकुमार रणसिंग, अश्विन गायकवाड, रोहीत नवले या सर्वांनी संगणमताने ग्रामपंचायत कार्यालय, पवारवाडी व पंचायत समिती, उस्मानाबाद येथे दि. 19.12.2022 रोजी पुर्वी एकुण 30,98,092  रकमेचा अपहार केला असल्याचे मा. मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या पत्रकान्वये सुचित केल्याप्रमाणे तसेच मा. तहसिलदार, उस्मानाबाद यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये निष्पन्न झाले. यावरुन उस्मानाबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नंदकिशोर शेरखाने यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 406, 409, 465, 464, 468, 470, 471, 477 (अ), 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top