उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महापुरुषांची बदनामी केल्यामुळे राज्यपालांना पदावरुन हटवावे याबाबत संसद भवन येथे निदर्शन करण्यात आले, अशी माहिती   खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी दिली. 

   मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जबाबदार व्यक्ती तसेच विविध लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बाबत अवमानजनक वक्तव्य करण्याची जणु स्पर्धाच सुरु झाली असल्याचे मागील काही दिवसांपासून दिसुन येत आहे. याबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य करुन महाराष्ट्रातील जनतेच्या भावनेस ठेस पोचविली तद्नंतर यांनी आपल्या वक्तव्यावर महाराष्ट्रातील जनतेची माफी मागण्याचेसुध्दा कष्ट घेतले नाही. राज्यपाल पद हे राज्यातील घटनात्मक प्रमुखाचे पद असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा अभ्यास न करता अवमानजनक वक्तव्य केले. राज्यपाल कोश्यारी एवढ्यावर न थांबता महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यावर सुध्दा अवमानजनक विधान करुन पुन्हा चर्चेत आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठातील मानद पदवी (डि एल आय टी) समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक विधान केले संपुर्ण भारताचे प्रेरणा स्थान असलेले आदर्श राजा, प्रजाहितरक्षक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात विधान केले यानंतर भाजपचे प्रवक्ते असलेले सुधांशु त्रिवेदी, प्रसाद लाड, गोपिचंद पडळकर आदी वाचाळ विरांनी महाराजांच्या संदर्भामध्ये अवमानजनक विधाने केली. याचा निषेध म्हणुन धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत व खासदार राजन विचारे यांच्यासह संसदेच्या बाहेर “हटा दो हटा दो राज्यपाल को हटा दो” च्या घोषणा दिल्या.

  उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या खासदारांकडून अशा वाचाळ विरांच्या विरोधात घोषणाबाजी करत अनोख्या पध्दतीने निदर्शन लोकसभेच्या 10 व्या सत्राच्या अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपाचे लोकप्रतिनिधीनी केलेल्या अवमानजनक वक्तव्याचा  निषेध करण्यात आला.

 
Top