तेर/ प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ( पेठ) येथे सशक्त भारत अभियानांतर्गत आयोजीत करण्यात आलेल्या क्रीडा सप्ताहाची  उत्साहात सांगता करण्यात आली .यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला .

तेर ता उस्मानाबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ( पेठ ) येथे मुख्याध्यापक विक्रम खडके यांच्या मार्गदर्शनाखाली सशक्त भारत अभियानांतर्गत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या क्रीडा सप्ताह कालावधीत इयत्ता पहिली ते सातवीच्या गटातील मुला मुलींसाठी १०० , २०० , ४०० , ६०० , मीटर धावणे , गोळा फेक , थाळी फेक , उंच उडी , लांब उडी , अडथळा , ४ ×१०० मीटर बॅटन रिले   , आदि वैयक्तिक क्रीडा प्रकारासह सांघिक खेळाचे  आयोजन करण्यात आले होते दरम्यान क्रीडा सप्ताहात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुला मुलींचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा सप्ताह यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक विक्रम खडके , गोरोबा पाडुळे , क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे ,  यरकळ गणपती , शेजाळ वर्षा , देशमुख शशिकांत , चौरे गोरख , नाईक उषा , मुंढे प्रभावती , हलसीकर रोहिणी , बंडगर लता , पांचाळ शकुंतला आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

 

 
Top