नळदुर्ग /प्रतिनिधी- 

 ग्रामपंचायत निवडणुकीमुळे नळदुर्ग (मैलारपुर) येथील श्री खंडोबा मंदिरात दि.१८ डिसेंबर रोजी चौथ्या रविवारी भाविकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मैलारपुर येथील जुन्या खंडोबा मंदिरात भाविकांसाठी अन्नदान सुरू करण्यात आले आहे. शहरांतील धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळाच्या वतीने हे अन्नदान करण्यात आले.

           नळदुर्ग (मैलारपुर) हे खंडोबाचे मुळ ठिकाण असुन पावणेदोन महिन्याच्या वास्तव्यासाठी श्री खंडोबा देव याठिकाणी आल्यानंतर खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी दर रविवारी भाविक याठिकाणी मोठी गर्दी करतात. चौथा रविवार दि.१८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान असल्याने याचा परिणाम म्हणुन मैलारपुरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसुन आले आहे. इतर रविवारी मंदिरात असणारी या रविवारी अतीशय कमी दिसुन आली.मैलारपुर येथील जुन्या खंडोबा मंदिरात श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी अन्नदान सुरू करण्यात आले आहे.या अन्नदानामध्ये सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव वऱ्हाडे गुरुजी यांचेही मोठे योगदान लाभले. या अन्नदानातील पहिल्या महाप्रसादाचा मान धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळ व शिवाजीराव वऱ्हाडे यांना मिळाला आहे. धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळाने आयोजित केलेल्या या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला आहे. मंडळाचे पिंटू जाधव, सुनिल गव्हाणे, गणेश मोरडे, निरंजन कोप्पा, नेताजी मुळे, संतोष जाधव, अण्णाराव जाधव, संकेत स्वामी, रोहित वाले, संजय जाधव, बबन जाधव, तात्या जाधव व स्वप्नील गव्हाणे यांनी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. या अन्नदानाचा शुभारंभ श्री खंडोबा देवाला नैव्यद्य दाखवुन करण्यात आला. यावेळी मंडळाचे उमेश जाधव, पिंटू जाधव, भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, पत्रकार सुहास येडगे, विलास येडगे,दादासाहेब बनसोडे,विशाल डुकरे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, अमर भाळे,मारुती खारवे, देवाचे पुजारी अशोक चव्हाण आदीजन उपस्थित होते.

 
Top