उस्मानाबाद /प्रतिनिधी- 

 शहरातील तेरणा पब्लिक स्कूलच्या १४ वर्ष वयोगटातील बास्केटबॉल संघाची विभागीय स्पर्धासाठी निवड झाली आहे.

 जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये या संघाने पोदार इंटरनॅशनल स्कूल संघाचा पराभव करून जिल्हयात प्रथम स्थान मिळविले. बास्केटबॉल संघामध्ये दुर्गेश दिनेश कदम, ओंकार निलेश कुंभार, अर्जुन प्रशांत गोपणे, आर्यन औदुंबर थोरबोले, पंकज मुंजाजी शिंदे, स्वप्निल नवनाथ गव्हाणे, कैलास अंगद लाडाने, शुभम नानाभाऊ लाडाने, प्रज्वल धनंजय देशमुख, ओंकार गुणवंत निकम, गणेश राजीव निळे, युवराज नरसिंग वराडे या खेळाडूंचा समावेश होता. सदरील संघ विभागीय स्पर्धासाठी अहमदपूर जि. लातुर येथे दि, १९ डिसेंबर २०२२ रोजी रवाना होत आहे. यशस्वी खेळाडूंचे यांचे संस्थेचे अध्यक्ष एल.एल.पायील, सचिव अनंतराव उंबरे, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य,शिक्षक, प्रशिक्षक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top