तेर/ प्रतिनिधी

एक दिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी.विलासजी जाधव साहेब गटशिक्षणाधिकारी .चिलवंते , केंद्रप्रमुख  पाटील  यांनी जि.प.कन्या प्रा.शाळा तेर येथे  भेट दिली.     

 विद्यार्थ्यांनी बनवलेले फोल्डस्कोप पाहिले. विद्यार्थ्यांनी कवायत , योगासने सादर केली. तसेच प्रयोगाचे सादरीकरण केले. त्यावर अतिरिक्त मुख्य.कार्यकारी .अधिकारी. जाधव  यांनी हवेचा दाब,सूर्यमाला,सूर्यग्रहण,  चंद्रग्रहण या प्रयोगाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिका  द्वारे अतिशय सुंदर पद्धतीने सादरीकरण करुन समजावून सांगितले.भाषा विषय व त्यातील प्रवासवर्णन त्यासाठी नकाशाचा वापर कसा करावा हे प्रत्यक्ष अध्यापन करुन  याबद्दल शिक्षक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.कोण होणार या प्रश्नातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व ध्येय मोठे ठेवून ते पूर्ण करण्यासाठी जिद्द, प्रयत्न , चिकाटी असली पाहिजे हे सांगताना स्वत:ची मी असा घडलो ही यशोगाथा सांगितली.गटशिक्षणाधिकारी.चिलवंते , केंद्रप्रमुख .पाटील  यांनी प्रत्यक्ष अनुभव देऊन अध्यापन केले. जि.प.कन्या प्रा.शाळा तेर व जि.प.कें.प्रा.शाळा तेर येथील  विद्यार्थी व सर्व शिक्षक बंधू भगिनींना मार्गदर्शन  केले.क्षिरसागर यांनी आभार मानले.


 
Top