तेर/ प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ( पेठ ) मधील खेळाडूंनी तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत संपादन करुन दबदबा निर्माण केला आहे. विशेष म्हणजे शाळेतील ९ खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली असून खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे .
क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत तेर ता. उस्मानाबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ( पेठ ) मधील खेळाडूंनी प्रथमच या स्पर्धेत सहभाग नोंदवत विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन करुन तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला आहे. यामध्ये १४ वर्ष वयोगटात मुलांमध्ये अर्जून काकासाहेब नारे लांब उडी प्रथम , प्रतिक सम्रत उमाकांत ८० मीटर हर्डल्स द्वितीय , रामगुडे सार्थक बालाजी उंच उडी द्वितीय , करण काका देवकते उंच उडी तृतीय क्रमांक पटकाविला तर मुलींमध्ये पल्लवी बापू माने १०० मीटर धावणे प्रथम , समृद्धी जयराम माने थाळी फेक द्वितीय , श्रावणी शहाजी टेळे ८० मीटर हर्डल्स प्रथम श्रावणी विठ्ठल शेळके ८० मीटर हर्डल्स द्वितीय , नंदिनी नवनाथ पाडूळे उंच उडी प्रथम , अक्षरा आप्पासाहेब अष्टेकर लांब उडी प्रथम , गायत्री गोकुळ सावतर उंच उडी तृतीय , पल्लवी बापू माने लांब उडी तृतीय क्रमांक पटकाविला त्याचबरोबर ४×१०० मीटर बॅटन रिले या सांघिक क्रीडा प्रकारात पल्लवी बापू माने , गौरी खंडू शिरगिरे , प्रज्ञा पद्माकर नागरगोजे , अक्षरा आप्पासाहेब अष्टेकर यांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला तर मुलांमध्ये अर्जून काकासाहेब नारे , अविनाश किशोर इंगळे , विशाल काकासाहेब कदम , महेश शिवाजी सलगर , अविराज बालाजी ढोबळे यांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला .विशेष म्हणजे शाळेतील ९ खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली दरम्यान या यशस्वी खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , सहशिक्षक गोरोबा पाडुळे यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी यशस्वी खेळाडूंचा मुख्याध्यापक विक्रम खडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक विक्रम खडके , गोरोबा पाडुळे , गणपती यरकळ , गिरे चंद्रकांत , देशमुख शशिकांत , चौरे गोरख , शेजाळ वर्षा , नाईक उषा ,. मुंढे प्रभावती , हलसीकर रोहिणी , बंडगर लता , पांचाळ शकुंतला आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .