तुलजापूर  /प्रतिनिधी- 

तुळजापूर तालुक्यातील मसला (खुर्द) ग्रामपंचायतच्या निवडणुकीतील उमेदवारासह जिल्ह्याचे खासदार व जिल्हाधिकार्‍यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निषेध करुन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

  मसला (खुर्द) येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार कांताबाई आण्णाराव साळवे यांच्या घराच्या दारावर अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र डकवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. उमेदवारासह खासदार तसेच जिल्हाधिकार्‍यांना संपवून टाकण्याची धमकी देणार्‍या या पत्रामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधिताचा शोध घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे अभिजित माणिकराव साठे, सतीश शिवाजी लोंढे यांनी केली आहे. 


 
Top