उमरगा/संवाददाता 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागणारे महाराजांबद्दल अपशब्द बोलत आहेत. खोटा इतिहास सांगत आहेत.   त्यांच्यावर भाजपा कारवाई का करीत नाही ?  छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचे भाजपाचे षडयंत्र आहे  का  असा प्रश्न उपस्थित करून  सुषमा अंधारे यांनी मातोश्रीच्या आदेशावरून येथील जनतेने व शिवसैनिकांनी निवडुण दिले होते. परंतू त्याच शिवसेनेसोबत गद्दारी केली. निवडुण देणारे ही तुम्हाला पाडू शकतात, असा इशारा अामदार चौगुले यांना सुषमा अंधारे यांनी जाहीर भाषणात दिला.  

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे सोमवारी (दि.५) उमरगा येथील महाप्रबोधन यात्रेत बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील, लातुरचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, जिपचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, शामलताई वडणे, माजी जिप सदस्य ॲड. दिपक जवळगे, तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, सुरेश वाले, कमलाकर चव्हाण, अजित चौधरी, सुधाकर पाटील आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या की, शिवसेना एक विचार आहे. कोण गेल्याने कांहीही फरक पडत नाही. महाप्रबोधन यात्रेमुळे भाजपाची भंबेरी उडाली आहे. गुजरात निवडणुकीत महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे घालवणारा भाजपा कर्नाटक निवडणुकीत महाराष्ट्रातील गावच्या गाव कर्नाटकात पाठवतील अशी भिती आहे. महाराष्ट्राला बदनाम करुन महाराष्ट्राला हतबल दाखवायचे आहे.   शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत गेल्यावर हिंदुत्व विसरल्याचे सांगितले जाते मग देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे घेतलेला शपथविधी क्या इश्क था क्या ? तेंव्हा तुम्ही हिंदुत्वाच्या बाजुनेच होतो का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तुम्ही सर्वजण हिंदुत्वासाठी गेलो तर अब्दुल सत्तार यांनी कोणते हिंदुत्व स्विकारले आहे ?  उध्दव ठाकरे घराबाहेर पडले नाहीत म्हणणा-यांनी मोदींना विचारले पाहिजे की, आपण एकही पत्रकार परिषद का घेतली नाही ?  . सदाभाऊ खोत यांचा वापर करून घेतल. सतत आंदोलन करणारे सदाभाऊ खोत आज शेताकडे जात आहेत. रवि राणांना बचू कडू विरोधात भाजपाच वापरत आहे.  असा टोला  अंधारे यांनी लगावला.   महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी ही महाप्रबोधन यात्रा असल्याचे त्यांनी सांगितले. व्यासपिठावर येताना अंधारे व इतर मान्यवरांनी हातात पेटती धगधगती मशाल घेतली होती. महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यासह विविध सामाजिक व राजकीय पक्षांच्या वतीने यावेळी अंधारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यांनी पिक विम्यासंदर्भात शिंदे सरकार  व राणा पाटील पिता पुत्रावर घणाघाती  टिका केली. 

 लाव रे तो व्हीडिओ -

 किरीट सोमय्या यांचे नारायण राणे, प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव, आनंदराव अडसूळ, अर्जुन खोतकर यांच्यावर केलेले आरोपाचा व्हीडिओ दाखवत यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याबद्दल सोमय्या गप्पच बसल्याचे व्हीडिओ सहीत दाखवून दिले. भ्रष्टाचारी भाजपाच्या वाॅशींग मशीनमध्ये टाकले की, ते स्वच्छ कसे होतात ? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. 


 
Top