तुळजापुर / प्रतिनिधी-

 इटकळ औट पोस्ट येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास राठोड यांनी नुकताच पदभार घेतला असून त्या निमित्ताने इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने नूतन पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास राठोड यांचा शाल फेटा पुष्पहार व पेन देऊन सन्मान करण्यात आला.

 यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे यांनी विलास राठोड यांच्या कर्तव्यदक्ष कामाविषयी माहिती देत शुभेच्छा दिल्या.पोलीस हेड विलास राठोड हे यापूर्वी उमरगा पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते तेथे ही त्यांनी उत्कृष्ट असे कार्य बजावत सर्व सामान्यांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे असेही बोलताना सांगितले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अझर मुजावर ; इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे, उपाध्यक्ष लियाकत , सचिव केशव गायकवाड,  नामदेव गायकवाड,  बालाजी गायकवाड , चांद शेख,  सामजिक कार्यकर्ते दयानंद गायकवाड ; अकील मुजावर ; सिद्धेश्वर हानूरे ; देवानंद बागडे यांच्यासह बहूसंख्य मित्र परिवार उपस्थित होते. शेवटी पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास राठोड यांनी उपस्थित पत्रकार बांधव व ग्रामस्थांचे आभार मानले. 


 
Top