उस्मानाबाद /प्रतिनिधी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिंगोली आश्रम शाळेत त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रारंभी मुख्याध्यापक शिंदे कुमंत भागवत व पर्यवेक्षक शेख अब्बास अली यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे प्रतिमेची पूजन केले.

यावेळी मुख्याध्यापक शिंदे कुमंत यांनी  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. पर्यवेक्षक शेख अब्बास अली यांनी ही विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब यांचा जीवन पट व संपूर्ण कार्याची माहिती देवुन विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेबांचा आदर्श ठेवून आधुनिक भारत घडवण्यासाठी कार्य केले पाहिजे असे मार्गदर्शन केले. दरम्यान विद्यार्थ्यांनी ही भाषणे, गीते सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील रत्नाकर यांनी केले.

 कार्यक्रमासाठी पडवळ.के.आर, जाधव चंद्रकांत, सुधीर कांबळे, सूर्यकांत बडदापुरे, शानिमे कैलास, राठोड प्रशांत, राठोड विशाल, मल्लिनाथ खोंदे, सतीश कुंभार, शिक्षकेतर कर्मचार्‍यांमध्ये सागर सूर्यवंशी, वसंत भिसे, गोविंद बनसोडे, अविनाश घोडके, चव्हाण रेवा व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार दीपक खबोले यांनी केले.

 
Top