उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या  परीक्षेचा निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत उस्मानाबाद तालुक्यातील सकनेवाडी येथील रामानंद चंद्रकांत साळुंके यांची विधी व न्याय विभागाच्या अवर सचिव पदी निवड झाली आहे.  त्यांच्या निवडीचे विविध स्तरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे.

 विधीज्ञ रामानंद चंदर साळुंके  हे उस्मानाबाद तालुक्यातील सकनेवाडी येथील रहिवासी आहे. उस्मानाबाद येथील न्यायालयात त्यांनी 6 वर्ष विधीज्ञ म्हणून काम पाहिले आहे. साळुंके यांनी यापूर्वी एसटी महामंडळात विधी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.त्यांची लातूर महानगरपालिका सचिव या पदी निवड झाली होती.  सन 2016 पासून ते महाराष्ट्र गृह निर्माण मंडळ मुंबई येथे सहायक विधी सल्लागार या पदावर कार्यरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील माजी मुख्याध्यापक चंद्रकांत साळुंके यांचे ते सुपुत्र आहेत.


 
Top