परंडा / प्रतिनिधी -

 केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास (DAY - NRLM)मंत्रालयमार्फत लिंग समभाव उपक्रमाद्वारे महिलांच्या सामाजिक सुरक्षा व समानतेच्या प्रश्नावर काम करण्यासाठी केंद्र शासनाने दिनांक 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये जेंडर आधारित भेदभावाविरुद्ध राष्ट्रीय मोहीमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

सदरील राष्ट्रीय मोहिमेचे उद्घाटन दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी देशाच्या राष्ट्रपती महामहीम मा.द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते करण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, परांडा अंतर्गत  दि.17/ 12/2022  तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, परांडा अंतर्गत राष्ट्रीय जेंडर अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या सहयोगाने परंडा तालुक्यातील शेळगाव, चिंचपूर खु.,पारेवाडी, रोहकल, अनाळा, भोत्रा, काटेवाडी,देऊळगाव,भोंजा, देवगाव खु.पिंपळवाडी, तांदुळवाडी हिंगणगाव बु.एकूण 13 गावामध्ये रॅलीचे आयोजन करून प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच देऊळगाव येथे बालमेळावा - खाना खजिना या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह , महिलावरील हिंसाचार प्रतिबंधात्मक उपाय योजना, मुलींचे शिक्षण, आरोग्य व  स्वच्छता, हुंडाबंदी, महिलांचे हक्क व अधिकार इत्यादी विषयावर प्रबोधन करण्यात आले. यामध्ये  स्वयंसहाय्यता समूहातील महिला, शाळेतील विद्यार्थी, गावामधील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) आणि इतर केडर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा कार्यक्रम गट विकास अधिकारी संतोष नागटिळक , तालुका अभियान व्यवस्थापक तुकाराम ढोरे , मुकेश लक्षे , माणिक सोनटक्के , प्रभाग समन्वयक धनंजय चांदणे , समाधान माळी , विजय गवळी , प्रिया पाटील , मोसीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला .


 
Top