उस्मानाबाद (प्रतिनिधी) :-

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित उस्मानाबाद हाफ मॅरेथॉनमध्ये हजारो नागरिक धावले. उस्मानाबाद स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या वतीने तिसर्‍या हाफ मॅरेथॉन स्पर्धेेचे 18 डिसेंबर 2022 रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या नोंदणीला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून 3000 जणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. 

उस्मानाबाद शहरात गेल्या दोन वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे तिसरे वर्ष होते. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर प्रकारात ही स्पर्धा घेण्यात येते. कोरोना काळात देखील या स्पर्धेला गतवर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक, विधि, व्यापारी यांच्यासह राज्यातील विविध भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. 

यावर्षीही स्पर्धेत नोंदणीसाठी 20 नोव्हेंबरपर्यंत मुदत ठेवण्यात आली होती. या कालावधीत देशभरातून मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. मुदतीअखेर 3000 जणांनी नोंदणी केली आहे. स्पर्धेच्या आयोजनात शहरातील विविध संस्था, संघटनांचे सहकार्य लाभले आहे.

18 डिसेंबर रोजी तुळजाभवानी स्टेडियम येथून पहाटे 5 वाजता उस्मानाबाद हाफ मॅरेथॉनला सुरुवात झाली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, सेंट्रल बिल्डिंग रोड, राजमाता जिजाऊ चौक या मार्गे हातलादेवी रोड आणि परत तुळजाभवानी स्टेडियम येथे हाफ मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट पदक व ई - प्रमाणपत्र आयोजकांच्या वतीने देण्यात आले सरवदे सर या मॅरेथॉन स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी पाच किलोमीटर अंतर पूर्ण करून तरुणांचा उत्साह वाढवला  तर दत्तात्रय व दैवशीला टेकाळे दांपत्याने २१ किलोमीटरची शर्यत वेळेत पूर्ण केली 

 पाच किलोमीटर मध्ये पुरुष गटात (१)ओंकार भोसले (२) संतोष राजेभोसले (३) कपील रामेगावे 

महिला गटातून (१)राजनंदिनी सोमवंशी (२)सोनिया पटेल (३) समीक्षा देवणे

पाच किलोमीटर शहर पुरुष गटातून (१)सुमित चव्हाण (२) प्रवीण जाधव (३)धीरज क्षीरसागर 

महिला गटात (१) गौरी सापते (२)संस्कृती धावणे (३) श्रावणी उंबरे

दहा किलोमीटर खुला गट पुरुष (१)शुभम राजेभोसले  (२) विष्णू लव्हाळे  (३)प्रथमेश जाधव 

 महिला गटात

 (१) शितल तिगाडे (२)आशा पवार (३ ) प्रणिता जाधवर

 ६० वर्षावरील दहा किलोमीटर गटात (१)दत्तात्रय माने (२) चांगदेव माने (३) दिलीपराव 

देशमुख

 २१ किलोमीटर खुला गट पुरुष

  (१)अरुण राठोड (२) रमेश सुरवसे (३) रितेश धोत्रे 

  खुला महिला गट 

  (१)योगिनी साळुंके (२) प्रमिला बाबर (३) आरती झंवर


एकाचा मृत्यू

भारत स्काऊट व गाईड कार्यालयातील कर्मचारी हनमंत पाटील यांचा या मॅरेथॉन  स्पर्धेत मृत्यू झाला. हनमंत पाटील यांनी पाच किलोमीटरच्या मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता. पोलिस लाईन समोरील रस्त्यावरून जात असताना ते अचानक खाली कोसळले. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. 

 
Top