तेर  / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर व परीसरातील शेतकऱ्यांच्या विद्युत पंप चोरीच्या घटना वारंवार घडत असून तेर येथे झालेल्या विद्युत पंप चोरीच्या आरोपी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

तेर येथील राजेंद्र अभिमान माने यांच्या शेतातील  पानबुडी मोटार व त्यांच्या शेजारी असलेल्या कलीम काझी यांच्या शेतातील विहीरीवरील विद्युत पंप अंदाजे किमंत २५००० हजार रूपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी  चोरून नेले होते ही. घटना दिनांक १७ ते १८ डिसेबर रोजी घडली होतीी. या प्रकरणी राजेंद्र माने यांनी ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानुसार ढोकी पोलिस ठाण्यात भा.द.वी.३७९  , ३४ कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता .त्यानंतर ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत , पोलिस उपनिरीक्षक कपील बुध्देवार , बीट अमंलदार प्रदीप मुरळीकर , प्रकाश तरटे  यांनी तपास करून तेर येथील यासेर मक्सूद काझी , प्रमोद काकासाहेब देवकते , राजकुमार अनिल लोमटे  यांच्याकडून दोन मोटार पाणबुड्या हस्तगत केल्या वरील आरोपीसह अमर माने यांनी मिळून गुन्हा केल्याचे उघड झाले. यावेळी ढोकी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून अमर माने हा फरार झाला आहे. या.प्रकरणी पुढील तपास बीट अमंलदार प्रदीप मुरळीकर करीत आहेत .

 
Top