तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील श्रीह तुळजाभवानी अभियांञीकी महाविद्यालयातील  द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांना भवितव्यासाठी combine passing द्या अशी मागणी  प्राचार्य, श्री अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर मार्फत कुलगुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यालय, लोणेरे यांना निवेदन देवुन केली आहे .

निवेदनात म्हटलं आहे की, मा. कुलगुरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, आम्ही श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर येथे द्वितीय वर्षात (२०२२-२३) शिकत असून, कोव्हीड-१९ मुळे सन २०१९ व २०२० मध्ये ऑनलाईन परीक्षा दिली. क्लासेस सुध्दा ऑनलाईन झाले होते, नेटवर्क प्रॉब्लेममुळे आमचे बेसिक पूर्ण झाले नाही आणि कोव्हीड-१९ नंतर आम्ही प्रथमच ऑफलाईन पेपर दिले, त्यामध्ये बरेच विद्यार्थी नापास झाले. तृतीय वर्षामध्ये combine passing लागू आहे, द्वितीय वर्ष २०२२-२३ ला लागू नाही, तरी मा.कुलगुरू नी आमच्या विद्यार्थ्यांची विनंती स्विकारून व आमच्या भविष्याचा विचार करून तात्काळ combine passing देण्यात यावे ही विनंती.यावर व्दितीय सञातील विद्यार्थ्यांच्या  स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top