तुळजापूर/ प्रतिनिधी-
येथील श्री तुळजाभवानी महाविद्यालयचे मराठी विभागप्रमुख डॉ शिवाजीराव देशमुख यांनी कौशल्या प्रकाशनतर्फे प्रकाशित केलेल्या महादजी शिंदे अलिजाबहाद्दर या ३०६ पृष्ठसंख्या असणाऱ्या ग्रंथाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा लातूर येथे झालेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या ३० व्या अधिवेशनात संपन्न झाला.
ग्रंथाचे प्रकाशन गोपाळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशाचे अध्यक्ष व पुणे विद्यापीठाचे माजी इतिहास विभाग प्रमुख, प्रा. म.( राजा) दिक्षित व आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते झाला.याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र टिळक विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ बी .डी. कुलकर्णी,मा. प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे,मा. प्राचार्य डॉ. सर्जेराव भामरे धुळे, मराठवाडा साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष साहेबराव गाठाळ, राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी . आर देशमुख, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. सतिश कदम, सचिव डॉ .शिवराज बोकडे, डॉ. अभिजित यादव, लेफ्टनंट डॉ. अर्चना टाक या मान्यवरांच्या उपस्थितीत या ऐतिहासिक ग्रंथांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.