तुळजापूर/ प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हयात व तुळजापूर तालुक्यात 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना  तात्काळ पिकविमा  द्यावा अन्यथा २७ डिसेंबर २०२२ रोजी तिर्थक्षेञ तुळजापूर येथील जुने बसस्थानक समोरील महामार्ग रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन दिला आहे. 

निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटना  जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, धनाजी पेंदे, राजु हाके, गुरुदास भोजने, विकास मारडे, निलेश घाटे, अदिनाथ काळे, प्रदीप जगदाळे, विकास भोजणे, रत्नेश घाटे, अमर भोजणे, संतोष भोसले आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


 
Top