उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा पोलीस अधीक्षक   अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद जिल्ह्य़ात पिंक पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यामध्ये  पोलीस प्रशासन व सामाजिक महिला कार्यकर्त्यां   किशोर वयीन मुलींचे प्रबोधन करतात.  िनांक.22/12/22 रोजी  श्रीपतराव भोसले हायस्कूल उस्मानाबाद येथे संस्थाचालक सौ प्रेमाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुलींचे प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. 

सदर कार्यक्रमांमध्ये मुलींना  मोबाईलचे फायदे तोटे , मुलींना येणाऱ्या अडीअडचणी  या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या सौ  उज्वला मसलेकर यांनी मार्गदर्शन केले, यात बोलताना सौ. उज्वला मसलेकर यांनी सांगितले की, मुलींनी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम व्हावे अवतीभोवती काय चालू आहे याचे निरीक्षण करावे क्षणिक मोहापाई आपल्या जीवनाचे नुकसान करू नये.  सौ. शुभांगी जहागीरदार, सौ. माधवी भोसरेकर यांनीही मार्गदर्शन केले. 

तसेच  कायदेविषयक माहिती  या विषयावर महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सौ वैशाली जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे सरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की कुठल्याही अडचणीत पोलीस प्रशासन आपल्या मदतीला आहे. तसेच सदर कार्यक्रमांमध्ये आत्मसंरक्षण या विषयावर स्वानंदी भोसरेकर हिने काठीचे प्रात्यक्षिक दाखवले आहे.प्रेमाताई पाटील यांनीही मुलींना समाजात वावरताना जागृत राहण्याचे आवाहन केले.

पिंक ग्रुप तर्फे जिल्हा परिषद कन्या प्रशाला उस्मानाबाद, जनता विद्यालय  रुईभर येथेही प्रबोधन पर कार्यक्रम घेण्यात आले. 

आजपर्यंत या उपक्रमात दीड हजार पेक्षा जास्त मुलींचे प्रबोधन करण्यात आले. त्यामधे बर्‍याच मुलींना आपल्या वैयक्तिक अडचणी  व रस्त्याने जाताना येताना होणारा त्रास सांगितला. समाजातील अश्या अडचणी पोलीस यंत्रणेने मार्फत सोडविण्यात येत आहेत.

 
Top