कळंब (प्रतिनिधी) :-

 सन २०२० आणि २०२१ मध्ये कोरोना माहामारी रोखण्यासाठी मोलाची कामगिरी पार पाडल्या बधल इंडियन मेडिकल असोसिएशन ची इंदिरा गांधी शांतता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि रोख एक कोटी रुपये असे असून लवकरच नवी दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. 

इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट चे चेअरमन माजी सरन्यायाधीश श्री टी एस ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे झालेल्या बैठकीत वरील पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 

सन २०२० आणि २०२१ साली उद्भवलेल्या कोरोना माहामारी मध्ये डॉक्टरांनी जिवाची पर्वा न करता कोरोना रूग्णांची अहोरात्र सेवा केली आणि कोरोना माहामारी आटोक्यात आणण्यासाठी व रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी मोलाची कामगिरी केली. यासाठी त्यांना हॉस्पिटल स्टाफ ( नर्सेस) चे बहुमुल्य सहकार्य लाभले. 

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या देशभरात १७०० शाखा असून ३५००००/-  (साडेतीन लाख)  सदस्य संख्या आहे.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आयएमएचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य (सी डब्ल्यूए सी मेंबर) डॉ रामकृष्ण लोंढे यांनी समाधान व्यक्त केले असून इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट चे आभार मानले आहेत. 

या पुरस्काराबद्दल आयएमएचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 
Top