तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील होत असलेल्या ४८ ग्रामपंचायत निवडणुकीतील दहा गावे संवेदनशिल असल्याने या दहा गावानमध्ये जादा बंदोबस्त बरोबरच विशेष लक्ष पोलिस प्रशासन ठेवणार आहे.   तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर, नळदुर्ग ,तामलवाडी पोलिस स्टेशन अंतर्गत ग्रामपंचायत निवडणुक होत असलेली दहा गावे संवेदन शिल आहेत. 

यातील तुळजापूर पोलिस स्टेशन अंतर्गत काक्रंबा, आपसिंगा हे गावे संवेदनाशील असुन येथे जादा पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार या गावांनमध्ये सातत्याने पेट्रोलिंग करण्यावर अधिक लक्ष ठेवले जाणार असल्याची माहीती तुळजापूर पोलिस स्टेशनचे निरक्षक अदिनाथ काशीद यांनी दिली तसेच नळदुर्ग तामलवाडी अंतर्गत  काटगाव,  निलेगाव,नंदगाव, देवसिंगानळ,सावरगाव, काटी, मसलाखुर्द,केमवाडी हे गावे संवदनशिल  असुन येथे जादा पोलिस बंदोबस्त लावला जाणार आहे.

 
Top