तुळजापूर / प्रतिनिधी-

 अपूर्ण निकृष्ट डांबरीकरण रस्त्याची चौकशी ०१ जानेवारी २०२३ पर्यंत करून नव्याने दुरुस्ती करा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा  निवेदनाद्वारे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य व  कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद, यांना  शिवाजी रामकृष्ण सावंत (माजी सैनिक) यांनी दिला आहे. 

निवेदनात म्हटलं आहे की, तुळजापूर तालुक्यातील काटगाव ते टेलरनगर व काटगाव ते देवकुरूळी - पिंपळा (खुर्द)- सुरतगाव- सावरगाव ते काटी या प्र.जि.मा.३९ या डांबरी रस्ता दुरुस्तीकरन चालू असलेल्या कामात जे काम झाले आहे ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण झाले आहे. सदर कामाची  नव्याने दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा मौजे काटगाव येथे ०१ जानेवारी २०२३ पासून परिसरातील नागरिकांसह उपोषण सुरू करण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाचे असेल असा इशारा  शिवाजी रामकृष्ण सावंत (माजी सैनिक) यांनी दिलीा आहे.


 
Top