उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

दर वर्षी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २००० किमी चे रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी    दि. 13 डिसेंबर 2022 रोजी लोकसभेच्या 10 व्या सत्राच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान शून्य प्रहरच्या माध्यमातून बोलताना केली. 

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यातील  एकूण रस्त्याची लांबी 4877 किलोमीटर व बार्शी तालुक्यातील   एकूण लांबी 1060 किलोमीटर तसेच औसा व निलंगा तालुक्यातील एकूण लांबी 897 किलोमीटर अशी एकूण लांबी 6834 किलोमीटर असून इतक्या लांबीच्या रस्त्याची अवस्था वाईट झाली असताना सन 2020- 21 या आर्थिक वर्षामध्ये धाराशिव जिल्ह्यातील फक्त 119 किलोमीटर, बार्शी तालुक्‌यातील 32 किलोमीटर, निलंगा आणि औसा तालुक्यातील 23 किलोमीटर म्हणजे एकूण केवळ 174 किमी लांबीचे रस्ते मंजूर केले आहेत. म्हणजेच सरासरी टक्केवारी पाहिली तर फक्त 2.54 टक्के इतकी नगन्य असून दर वर्षी रस्ते मंजुर करावयाची हीच परस्थिती राहिली तर ग्रामीण रस्त्याची अवस्था कायम राहुन नागरिकांना समस्येचा सामना करावा लागणार असल्याने केंद्र सरकारने एकुण खराब लांबी असलेल्या 6834 किमीच्या 30 टक्के प्रत्येक आर्थिक वर्षात म्हणचे 2050 किमीचे रस्ते प्रत्येक आर्थिक वर्षात मंजुर करुन दुरुस्त करावेत अशी मागणी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली.

 

 
Top