उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्हयात झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व व ऐतिहासिक यश मिळाले असुन सर्वांधिक गावामध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित सरपंच निवडून आले आहेत. पंतप्रधान ना.नरेंद्रजी मोदी साहेब व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर जिल्हयातील जनतेने मोठा विश्वास ठेवला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने अल्पवधीतच घेतलेले मोठे निर्णय व सर्व सामान्यांना होत असलेली मदत या निकालातून प्रतिबींबीत होते. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प व सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी मंजुर करण्यात आलेला निधी त्याचप्रमाणे अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी देण्यात आलेले अनुदान, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना  प्रोत्साहनपर अनुदान या माध्यमातून शेतकऱ्यांना भरीव मदत झाली आहे. आजच्या निकालाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी अधिकच वाढली असून जिल्हावासियांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आगामी काळात तुळजापूर तिर्थक्षेत्राच्या विकासासह जिल्हयात मोठे प्रकल्प आणुन अर्थकारणाला बळकटी देण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न राहील व यासाठी शिंदे फडणवीस सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे असा विश्वास देतो.  िल्हयातील सर्व मतदारांचे मन:पुर्वक आभार-आ.राणाजगजितसिंह पाटील

 
Top