उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यात रोहयो, पंचायत समिती आणि त्यातील योजनेत घोळ घालण्याचे व्यसन काही भ्रष्ट लोकांना लागले आहे. उस्मानाबाद, तुळजापूर व कळंब पंचायत समिती मधील भ्रष्टाचाराची एक एक प्रकरणे बाहेर येऊन गुन्हे नोंद होणे, निलंबन, कायमची सेवासमाप्ती यासारखी कडक कारवाई होत असतानाही काही जण सुधारले नसल्याचे दिसते.रोहयो मजुरांचे मस्टर मंजुर करण्यासाठी लाचेची मागणी करताना कळंब पंचायत समिती मधील दोघे जण जाळ्यात अडकले आहेत.

 कळंब पंचायत समिती मधील कंत्राटी तांत्रिक सहायक सचिन अनंतराव आडसूळ व अडसूळवाडी येथील कंत्राटी रोजगार सेवक बबन सुदाम शिंदे यांनी 3 हजार 600 रुपयांची मागणी केली. यातील तक्रारदार यांचे वडिलांचे नावे असलेल्या शेतजमिनीत लागवड केलेल्या सीताफळ फळबागेसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत मजुरांचे रोजगार मस्टर मंजूर करण्यासाठी या दोघांनी 22 नोव्हेंबर रोजी पंच साक्षीदार यांचे समक्ष 3600 रुपये लाचेची मागणी केली

 सापळा अधिकारी म्हणून विकास राठोड, पोलीस निरीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस अंमलदार ईफ्तेकार शेख,मधुकर जाधव,सचिन शेवाळे, विशाल डोके हे सहभागी होते.

 
Top