उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आळणी  तालुका उस्मानाबाद येथील जिल्हा परिषद शाळेत दि.20 डिसेंबर 2022 रोजी   बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न 

या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला.

आनंद मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.

सकाळी  उस्मानाबाद तालुका गटशिक्षणाधिकारी श्री चिलवंते साहेब  यांच्या शुभहस्ते व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विजयकुमार नांदे, उपसरपंच श्री कृष्णा गाडे,प्रदीप वीर,हनुमंत लावंड,शरद लावंड,पवन कदम,संजय थोडासरे,पोपट कोळी ,जयशंकर पौंळ ,प्रसाद वीर,नवनाथ गाडे , सौ  अफसाना शेख शाळेचे मुख्याध्यापक बशीर तांबोळी  या मान्यवरांच्या उपस्थितीत  बाल आनंद मेळाव्याचे फित कापून  उद्घाटन करण्यात आले. संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन उस्मानाबाद तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री चिलवंते साहेब विषय साधन व्यक्ती श्री जानराव साहेब व मान्यवर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक  मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा,त्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान मिळावे   ,बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार व्यापारातून कळवा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने  आनंद मेळाव्याचे आयोजन केले गेले. 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जेष्ठ शिक्षिका वर्ष्या डोंगरे ,सुनीता कराड ,क्रांती मते, राधाबाई वीर ,सुलक्षणा ढगे, सत्यशीला म्हेत्रे,  श्री उत्तम काळे ,हनुमंत माने यांनी परिश्रम घेतले. या आनंद मेळाव्यात 150 विद्यार्थ्यांनी भाग घेतला व जवळपास 150 वस्तूचे पदार्थ विक्रीस ठेवले होते यातून 17865 रुपयांची उलाढाल झाली ,गाडगेबाबा च्या पुण्यतीथी निमित्त सर्व शिक्षकांनी परिसर स्वच्छ करून सांगता केली

 
Top